The गडविश्व
ता.प्र /धानोरा, १२ जुलै : तालुक्यातील विकासासाठी सरकार आणि प्रशासनाची उदासीनता दिसून येते त्याचा ताजा उदाहरण म्हणजे धानोरा मुरुमगाव मार्गावर आमपायली गावाजवळ पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे. खेडेगाव मुरुमगाव येथील महिला कांताबाई रामलाल मार्गिया (वय अंदाजे ६२ वर्ष) हिला जिव गमवावे लागले.
धानोरा ते मुरुमगाव मार्गावर रामलाल मार्गिया बुधवार १३ जुलै रोजी सकाळी ०९.०० वाजता खाजगी कामाकरिता धानोरा येथे येत असताना खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे अंदाज चुकल्याने त्याची पत्नी वाहनावरून उसळून खाली डोक्याच्या भारावर लय पडल्याने महिलेला तिथेच जिव गमवावा लागला.
रस्ता पूर्णपणे जागोजागी फुटलेला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत असल्याची बातमी एका वृत्तपत्रात प्रकाशित झाली आणि आज मुरूमगाव रस्त्यावरील खड्ड्यांनी एका महिलेचा जीव गेला.
रस्तादुरुस्ती करण्याबाबत वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. धानोरा- मुरूमगाव महामार्ग हा समोर छत्तीसगड राज्याला जोडलेला असल्याने या मार्गावर जड वाहनांची दररोज ये-जा असते. तसेच या परिसरातील लोकांना मुख्यालयाच्या कामाकरिता धानोऱ्याला यावेच लागते. परंतु रस्त्यावरती जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने दुचाकीवरील महिला पडुन जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज १२ जुलै २०२३ ला सकाळी ९.०० घडली. सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.