The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १० : तालुक्यातील तोयागोंधी येथील युवकाने ‘घर जावई न बनण्याच्या नादात’ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ जून रोजी उघडकीस आली. सुधाकर महारु पोटावी (वय २५) असे मृतकाचे नाव आहे. त्याने आपल्या शेतात विष प्राशन केले.
मृतक सुधाकर याचे एका मुलीसोबत प्रेम होते. लग्नासाठी मुलीकडून घर जावई बनून यावे असा प्रस्ताव होता. दरम्यान सुधाकरला सुरसुंडी नजीकच्या शिवटोला येथे घर जावई म्हणून नेऊन देणार होते. परंतु त्याला घर जावई म्हणून जाणे पसंत नसल्याने त्याने एक दिवसांपूर्वीच ९ जून ला आपल्या शेतात विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. मृतक हा ९ जून ल दुपारी शेतातून आंबे घरी नेऊन दिला व त्यानंतर दुपारल परत आपल्या शेतामध्ये निघून गेला व सायंकाळी तोयागोंदी येथे पाऊस वादळ आल्याने सर्व लोक घरी आले. सायंकाळ झाली तरी सुधाकर हा घरी न परतल्याने त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून शेतामध्ये गेले असता तो मृतावस्थेत आढळून आला. त्याला ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे दखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांला मृत घोषीत केले. दरम्यान त्याला घरजावई बनून जाणे पसंत नसल्याने त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असे बोलल्या जात आहे. आज शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास धानोरा पोलीस स्टेशन करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora #susaid )