-महसूल विभागाची कारवाई
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२२ : तालुक्यातील हेटी येथे रेतीची अवैधपणे वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने १९ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास पकडून कारवाई. सध्या महसूल विभाग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने याच परिस्थितीचा फायदा घेत तालुक्यात अवैध रेती ची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.
तालुक्यातील हेटी येथे अवैधपणे रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने थांबून चौकशी केली असता त्यामध्ये अवैध रेती भरलेली आढळून आली. सदर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय धानोरा येथे जमा करण्यात आले. पंकज मेहर रा. तुकुम असे ट्रॅक्टर मालकाचे नाव असल्याचे कळते. सदर कारवाई नायब तहसीलदार देवेंद्र वाळके, पुरवठा निरीक्षक नंदनवार व त्यांच्या पथकने केली.
(#thegdv #thegdv #gadchirolipolice #gadchirolinews #dhanora )