धानोरा : अचानक विजेची तार तुटल्याने दुचाकीस्वार जखमी

395

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ११ फेब्रुवारी : येथील जिल्हा परिषद शाळेसमोर विजेचे तार अचानक स्पार्क होऊन विद्युत तार तुटून पडल्याने दोन युवक थोडक्यात बचावले पण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शनिवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. धानोरा पासुन येरकड मार्गावर जि.प. हायस्कुल आहे. याच शाळेच्या समोरुन आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी संदीप धात्रक व महेश हांगे आपल्या दुचाकीने दवाखाण्याकडून जेवण करण्याकरिता हॉटेल मध्ये जात असतांना नेमकी त्याच वेळी विद्युत तार तुटून त्यांच्या अंगावर पडली त्या वेळेस दोघेही तारेच्या धक्याने खाली पळले व किरकोळ जखमी झाले. विद्युत पुरवठा सुरु असता तर त्या दोन्ही युवकांचा नाहक जीव गेला असता मात्र सुदैवाने जीवित हानी टळली.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Dhanora) (The GDV)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here