धानोरा : अलंकार विद्यालय निमगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा

330

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २२ जानेवारी : तालुक्यातील महिला सूर्या आदिवासी विकास शिक्षण संस्था निमगाव येथील गणेश अलंकार विद्यालयात तीन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, पाककृती व इतर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन विश्वनाथजी वरखडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक बी. डब्ल्यू. सावसाकडे तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच चेतन सुरपाम, नानाजी कोवे, आनंदराव वरखडे, लालाजी नगराळे, मिलिंद वासनिक, भोलानाथ सोनटक्के, मुनेश्वर शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला सूर्या आदिवासी विकास शिक्षण संस्था अंतर्गत गणेश अलंकार विद्यालय निमगाव येथे १९ जानेवारी २०२३ रोजी विविध क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.त्यात कबड्डी स्पर्धा, चमचा गोळी, संगीत खुर्ची, स्लो सायकलीन, रंनिग, त्यानंतर २० जानेवारी ला विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यातआले.तर २१ जानेवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ आयोजित केलेला होता.
बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच तुळशीदास कुकडकर, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील रामदासजी वासेकर, मुख्याध्यापक बी. डब्ल्यू. सावसाकडे, सहाय्यक शिक्षक दिवाकर भोयर, श्रीरामे मॅडम ,नागतोडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धातील प्रथम, द्वितीय, आणि तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख नागदेवते यांनी केले तर आभार डी. आर. भोयर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर लोहारे, भुवनेश्वर गजबे, बबलु गेडाम यांचेसह शाळेतील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here