धानोरा : चिंचोली गावातील नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त

173

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ११ ऑक्टोबर : तालुक्यातील चिचोली हि स्वतंत्र ग्रामपंचायत असून गावामध्ये अनेक समस्या असतानाही येथील ग्रामपंचायत चे दुर्लक्ष असल्याचे गावकरी म्हणतात.
देश अमृत महोत्सव साजरा करतोय इथे जायलाच चांगला आणि पक्का रस्ताच नाही. मुख्य रस्त्यापासून ते जेवलवाही रस्त्यापर्यंत म्हणजे १५० मीटर चा रस्ता पूर्णपणे उघडलेला आहे. मोठमोठे दगड बाहेर निघालेले आहेत. अशा मार्गावरुन प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते.गावातील दोन्ही बाजूच्या नाल्या पूर्णपणे भरलेल्या असून अनेक वर्षापासून उपसल्याच नाहीत. तुंडुंब भरल्याने घरातील सांडपाणी हे नालीने न जाता रस्त्याने पाटाच्या पाण्यासारखे वाहत आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरच गटार तयार झाली आहे. तसेच विहिरीजवळ सांडपाणी साचलेले आहेत. लोकांना शुद्ध पाणी न मिळता गटाराचे पाणी विहिरीला झिरपत असून त्या विहिरीचे पाणी पिण्याचे योग्य असेल का? आरोग्य खराब करनण्यासाठी तेच पाणी पुरेसे असल्याचे पहायला मिळते. त्या विहिरीच्या पाण्यापासून अनेक रोगराईला आमंत्रण दिल्यासारखे होते. स्वच्छतेचा उपक्रम ग्रामपंचायत राबवते कुठे? काही भागात तर नालीच नाही. त्यामुळे घरातील सांडपाणी अक्षरशः रस्त्यावर राहत आहे आणि इतरही समस्या आवासुन उभ्या आहेत. या अनेक समस्या तातडीने सोडवावी अशी नागरिकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here