धानोरा : ट्रकच्या अपघातात चालकासह क्लीनर जखमी

1544

The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि.१३ : गडचिरोली वरून धानोरा मार्गे छत्तीसगडला जात असलेल्या ट्रकचा मुरुमगाव ग्रामपंचायत अंतर्गत बेलगाव येथे आज १३ मे रोजी दुपारी झालेल्या अपघातात चालकासह क्लीनर जखमी झाला.
गडचिरोली येथून धानोरा मार्गे छत्तीसगढ राज्यात मोठ्या प्रमाणात ट्रकची रहदारी सुरू असते. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास युपी ७१ एटी ५६१९ क्रमांकाच्या ट्रकचा मुरूमगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बेलगाव येथे साफ्ट तुटल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून क्लिनर किरकोळ जखमी झाला. सोहेल मोहम्मद अन्सारी असे ट्रक चालकाचे नाव असून क्लिनर गुपरान मोहम्मद अन्सारी दोघेही उत्तर प्रदेश आंबेडकर नगरचे आहेत. दोघानाही उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(#thegdv #thegadvishva #dhanora #accident )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here