The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २७ : तालुक्यातील ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकांचे थकित मानधना करिता काम बंद आंदोलनाचे निवेदन गटविकास अधिकारी, पंचायत समिती धानोरा यांना गुरुवार २७ फेब्रुवारी २०२५ रोजी संघटने दिलेल्या निवेदनातून दिले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,माहे ऑक्टोंबर २०२४ ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संगणक परीचालकांचे मानधन थकीत असून ते मिळाले नाही. राज्यातील ग्रामपंचायतमध्ये संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून मागील १४ वर्षापासून संगणकपरिचालक सुमारे ७ कोटी जनतेला ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा किंवा किमान वेतन देणे. नाहीतर किमान मासिक २० हजार मानधन देणे या दोन प्रमुख मागण्यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली. तसेच शासन स्तरावर बैठका झाल्या, अनेक वेळा शासनाच्या वतीने लेखी व तोंडी आश्वासने देण्यात आली. परंतु ती न पाळल्याने मुंबई येथील आझाद मैदानावर २१ फेब्रुवारी २०२४ ते १६ मार्च २०२४ असे सुमारे २५ दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले, या आंदोलांनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ग्रामविकासमंत्री माडवले यांच्या सोबत गिरीराजी महाजन तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या सोबत बैठका व चर्चा झाली होती, त्यात राज्य संघटनेच्या वतीने शासना समोर संघटनेने आपल्या मागण्या मांडल्या होत्या. तरी माहे ऑक्टोंबर २०२४ पासुन आजपर्यतचे संगणक परीचालकांचे मानधन न मिळाल्याने सर्व संगणक परीचालकांच्या कुटुंबावरती उपासमारीची पाळी आलेली आहे. वेळोवेळी शासनाने सोपविलेली कामे वेळेत करण्याचे धाडस हा संगणक परीचालक करीत असतो व आपल्या राज्याला प्रथम स्थानी ठेवित असतो परंतु आज त्याच संगणक परीचालकाला अल्पशा मानधनावर कूटूंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागतो परंतु हे अल्पशा मानधनावर तेही वेळेवर मिळत नसल्याने आज त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आल्यामूळे आज २७ फेब्रुवारी २०२५ पासुन हक्काचे मानधन मिळण्याकरीता कामबंद आंदोलन संगणक परिचालक करीत आहेत. आपल्या स्तरावरुन पाठपुरावा करुन लवकरात लवकर माहे ऑक्टोंबर २०२४ ते आजतागायत पर्यंतचे मानधन अदा करण्याचे करावे. अन्यथा मानधन मिळेपर्यत सर्व संगणक परीचालकांच्या सर्वानुमते ऑनलाईन व ऑफलाईन कामे बंद ठेवण्याचे ठरविले असल्याचे निवेदन उमेश वासनिक अध्यक्ष संगणक परिचालक संघटना धानोरा, भोलेनाथ कावळे सचिव संगणक परिचालक संघटना धानोरा, शिवाजी कटकेलवार उपाध्यक्ष यांनी दिले.
