The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०२ : रस्ता दुरुस्ती कामाचे एम.बी देण्याकरीता बांधकाम उपविभाग कार्यालय, धानोरा येथील कनिष्ठ अभियंता अक्षय मनोहर अगळे ( वय २९ ) याने लाच रकमेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. याप्रकरणी धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धानोरा तालुक्यातील बोधनखेडा पोचमार्ग तुमडीकसा-हिरंगे, रंगगाव-गोटाटोल, मुरूमगाव-रिडवाही येथील रस्ता दुरुस्तीचे काम तक्रारदार यांनी केले. केलेल्या कामाचे एम. बी देण्याकरिता बांधकाम उपविभाग कार्यालय, धानोरा येथील कनिष्ठ अभियंता अक्षय मनोहर अगळे याने तक्रारदारास १ लाख ७० हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली. लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केली असता तक्रारीच्या अनुषंगाने सापळा कारवाईचे आयोजन केले असता पंच साक्षीदारा समक्ष सुस्पष्ट १ ऑगस्ट रोजी लाच रकमेची मागणी केल्याने धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कनिष्ठ अभियांताचा घराची झडती घेणे सुरू आहे.
सदरची कार्यवाही लाप्रवि नागपूर चे पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधिक्षक सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक चंद्रशेखर पी. ढोले यांचे पर्यवेक्षणात पो.नि. श्रीधर भोसले, पोहवा राजेश पदमगिरीवार, पो.अं. संदीप उडान, संदिप घोरमोडे, प्रविण जुमनाके व चापोहवा प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.
( #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #acb #acbtrapd)