धानोरा : डॉ. देवेंद्र सावसागडे यांचा भावनिक सत्कार, ग्रामीण रुग्णालयात निरोप समारंभ
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०२ : धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्कृष्ट सेवा बजावणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र डोमडुजी सावसाकडे यांची इएनटी (कान, नाक व घसा) अभ्यासक्रमासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली आहे. त्यानिमित्त ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने त्यांचा भावनिक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
डॉ. सावसाकडे यांनी धानोरा येथे वैद्यकीय सेवेत कार्यरत राहून अनेक रुग्णांना दर्जेदार उपचार दिले. त्यांच्या समर्पित सेवेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झाला होता. त्यांच्या पुढील शिक्षणाच्या संधीसाठी कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजभे, डॉ. शुभम मुपीडवार, डॉ. शीतल टेभुर्णे, डॉ. मंजुषा लेपसे, डॉ. सीमा गेडाम तसेच गणेश कुडमेथे, पंकज देविकार, आनंद देविकार आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी डॉ. सावसाकडे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे समाजासाठी असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. देवेंद्र सावसाकडे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानत ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक असल्याचे व्यक्त केले.
