The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २१ जुलै : तालुक्यातील निमनवाडा गट ग्रामपंचायत मध्ये चार गावांचा समावेश आहे. त्याचे विभाजन करून निमगावला स्वतंत्र ग्रामपंचायत उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वानुमते जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रामसभेत एकमुखाने पारित करण्यात आला.
काल गुरुवार २० जुलै २०२३ रोज निमनवाडा येथिल जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर देवराव मोंगरकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
निमनवाडा येथील गट ग्रामपंचायत मध्ये निमगाव, मासरगाटा, बोरी, निमनवाडा या चार गावांचा समावेश आहे. या चार गावांपैकी सर्वात जास्त लोकसंख्या निमगाव येथील असुन निमगावला स्वतंत्र ग्रामपंचायत उपलब्ध करून द्या असा निर्णय ग्राम सभेत एकमुखाने घेण्यात आला. सरपंचा छायाताई मडावी व उपसरपंच चेतन सुरपाम, ग्रा.प.सदस्या गोपिका ख्रोब्रागडे , रामटेके बाई इतर प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत दुपारी १.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित ग्रामसभेत एकुण १५६ महिला व पुरुष सभासद उपस्थित होते.
या पुर्वी असाच ठराव पारित गावकऱ्यांनी अनेकदा हि मागणी केली. शासन दरबारी पत्र व्यवहार केला मात्र शासनाने यावर आजता गायत कोणतेही कार्यवाही केली नाही. ज्या गावची लोकसंख्या ५०० च्यावर आहे त्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याची नियमावलीत आहे. पण याकडे शासनच दुर्लक्ष करीत असेल तर गावाची प्रगती होईल कशी असा प्रश्न गावकरी विचारित आहेत. येथील बहुसंख्य लोकांना कार्यालयीन कामासाठी वारंवार निमनवाडा येथे यावे लागते. हे लोकांना परवडणारे नाही. ग्रामसभेचे संचालन सचिव मुळे यांनी केले.