धानोरा : अवैधरित्या रेतीची तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले

224

– महसूल विभागाची कारवाई
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.१६ : तालुक्यातून रात्रीस अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर धानोरा येथे महसूल विभागाने कारवाई करत ताब्यात घेतले. सदर कारवाई १६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
शासनाला गौनखनिजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. मात्र महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकत अवैध रित्या रेतीची तस्करी काही तस्कर करत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असतो. अशातच धानोरा येथून रात्रीच्या सुमारास अवैधरित्या रेतीची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली असता तहसीलदार राहुल पाटील यांनी १६ जानेवारी रोजी पहाटे सापळा कारवाई करत अवैधरित्या रेती वाहतूक करणरी एमएच ३३ व्ही ५२८ या क्रमांकाची ट्रॅक्टर पहाटे ३ वाजता जप्त करत तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे. तर चालक मालक दिलीप नागापूरे यावर पुढील कारवाई सुरू आहे.
सदर कारवाई आले. तहसिलदा राहुल पाटील यांच्यासह तलाठी अविनाश कोडाप, कोतवाल यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here