The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १० ऑक्टोबर : तालुक्यातील चिंचोली नदी घाटावर अवैधरित्या रेती वाहतूक होत असल्याची गोपनिय बातमी मिळताच महसूल विभागाने धाड टाकून टॅक्टर जप्त केल्याने अवैध रेती चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
चिंचोली घाटातुन अवैध रेती वाहतूक करणारे एमएच ३३ /२२६६ क्रमांकाची ट्रॅक्टर सालेभट्टी येथे महसूल विभागाच्या पथकाने ७ ऑक्टोर च्या मध्यरात्री पकडली. सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून ट्रॅक्टर सुधाकर भूपतवार यांच्या मालकीची आहे. याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. तहसीलदार ए. बी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डी. के. वाळके व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. सदर कारवाईने धानोरात खळबळ माजली आहे.