The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : धानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिंगली येथे आज २९ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सो, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे सो, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सो, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सो. यांच्या संकल्पनेतून तसेच साहिल झरकर सा. उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत “एक गांव एक वाचनालय ” संकल्पने अंतर्गत शहीद केशव मनुजी उसेंडी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून साहिल झरकर सो. उपविभागिय पोलीस अधिकारी धानोरा यांनी व पोनी. गौरव गावंडे पोलीस स्टेशन, धानोरा यांनी विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन करून वाचनाचे महत्व पटवून दिले. सदर उदघाटन कार्यक्रमास पोस्ट धानोरा चे अधिकारी व गावातील ६० ते ७० विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.