The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २९ : तालुक्यातील रांगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत आज २९ डिंसेबर ला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनिचे उद्घाटन जि.प.माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्या हस्ते दुपारी २.०० वाजता पार पडले. सोहळ्याचे अध्यक्ष शशिकांत साळवे सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सतिश टिचकुले गटविकास अधिकारी पं.स. धानोरा, प्रमुख वक्ते बी.जी. चौरे गडचिरोली, धनंजय चापले जेष्ठ अधि.जि.शि.व प्र.सं., गडचिरोली, विनीत मत्ते जेष्ठ अधिजि.शि.व प्र.सं., गडचिरोली, सौ. फालेश्वरी गेडाम सरपंच ग्रामपंचायत रांगी, नरेंद्र भुरसे अध्यक्ष शा.व्य.समिती रांगी आदि मान्यवर उपस्थित होते.
धानोरा पंचायत समिती अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयाला अनुसरुन आरोग्य, जीवन (जीवन / जीवन शैली), शेती/कृषी, दळणवळण आणि वाहतूक, आणि संगणकीय विचार हे विषय समाविष्ट केलेले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आखाडे विस्तार अधिकारी धानोरा यांनी केले तर संचालन वाढई यांनी तर हेमंत कांटेंगे मुख्याध्यापक रांगी यांनी आभार मानले.
