धानोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंत्र प्रदर्शनी कार्यक्रमाचे उद्घाटन

358

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ३० नोव्हेंबर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंत्र प्रदर्शनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य लोणे तर उद्घाटक उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार वाकुडकर, कार्यकारी अभियंता विद्युत विभाग देशोपाल शेंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडताना दिसत आहे आणि म्हणूनच या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थी यांचे तंत्र प्रदर्शनी भरून त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी तंत्र प्रदर्शनी भरविण्यात आलेली होती. या प्रदर्शनामध्ये ३० ते ४० मॉडेल ठेवण्यात आले होते व या मॉडेल इंजिनिअरिंग ट्रेड मधून तीन तर नॉन इंजिनिअरिंग ट्रेड मधून एक असे चार मॉडेल्स जिल्हास्तरावर प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रशिक्षणाचे मान्यवरांनी अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण संस्थेतील ए.एम. रामटेके, सावरकर, मोहुरले, मशाखेत्री, जांभुळकर, नरोटे, चव्हाण,टेंभुर्णे, चांदेवार, रामटेके, दासाबाई कुंमरे व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.एम. रामटेके, प्रास्ताविक एस.ए. रामटेके यांनी केले तर आभार आशिष मशाखेत्री यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here