धानोरा : ग्रामपंचायतने केलीली वीजचोरी महावितरणने पकडली

171

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २५ मे : धानोरा तालुका पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गट ग्रामपंचायत चिंचोली येथील ग्रामपंचायत मध्ये चोरुन सुरू असलेल्या विद्युत पुरवठावर महावितरण कंपनीने धाड टाकून पकडल्याची घटना २५ मे २०२३ रोजी ला सकाळी घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. सदर ग्रामपंचायत वर काय कारवाई होते याकडे तालुक्यातील लोकांचे लक्ष लागलेले आहे.
सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे, गट ग्रामपंचायत चिंचोली येथील कार्यालयात विद्युत बिल न भरल्याने महावितरण कंपनीने दिड वर्षांपुर्वीच विद्युत प्रवाह खंडित केलेला होता. मात्र नियमानुसार त्यांना थकीत असलेले बिल भरण्यास ग्रामपंचायतीला कळविण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने सदर बिल भरलेले नसताना सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात नियमित विद्युत कसा , ग्रामपंचायतचे आँनलाईन चे नियमित कामे कसे पार पडतात असा प्रश्न महावितरण पुढे निर्माण झालेला होता. गावात विद्युत रोषणाई कशी केली जात होती. लोकांना ऑनलाईन दाखले कसे दिले जात होते, विद्युत पुरवठा अभावि अनेक ऑनलाईन प्रणालीचे कामे कोणत्या पद्धतीने पार पडतात, विद्युत मीटर नसल्याने ग्रामपंचायतीने थेट वायर टाकून इलेक्ट्रिक पोलवरून नियमित विद्युत पुरवठा होत असल्याची बाब लक्षात आल्यावर महावितरण कंपनीने धाड टाकून रंगेहाथ पकडले. हा प्रकार सर्रास दीड ते दोन वर्षापासून सुरू असल्याची माहिती महावितरण कार्यालय धानोरा यांना कळल्या नंतर लगेच कारवाई करीत चिंचोली येथील ग्रामपंचायत चा विद्युत पुरवठा आज २५ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता चोरीला जात असलेला विद्युत पुरवठा पकडल्या नंतर तात्काळ बंद करण्यात आला. त्यासोबतच दीडशे फूट सर्विस वायर महावितरण कंपनीने जप्त केला. यावेळी सहाय्यक अभियंता एस.बि.ननावरे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. घटनास्थळी पंचा समक्ष मोका पंचनामा करून महावितरण कंपनीने कारवाई केली. परंतु पुढील काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मात्र या दीड ते दोन वर्षापासून ग्रामपंचायतीने ऑनलाईन कामे दोन नंबर मधेच केल्याचे दिसून येते. मात्र असे करण्याचे कारण काय? ग्रामसेवकाला स्वताच्या खिशातून बिल भरायचे होते काय? तेव्हा पासून कँश बुकला नोंद नाही का? ऑडिट नोंद आहे कि नाही हेही तपासणे गरजेचे आहे. सदर रक्कम संबंधित सचिवाकडून वसूल करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.

गटग्रामपंचायत चिंचोली येथील ग्रामसेवक जिवनदास ठाकरे यांना भ्रमणध्वनी वरून विचारणा केली असता मला असा प्रकार सुरू असल्याची माहिती नव्हती. मात्र तत्कालीन सचिवाने दिड वर्षा पुर्वी डिमांड भरली मात्र मिटर लावून दिले नसल्याचे सांगितले.
परंतु या निमित्याने ही बाब ग्रामसेवकांच्या लक्षात का आली नाही. सदर चोरीवर महावितरण ने कारवाई केल्यास त्याची भरपाई कोण करणार असा प्रश्नही आता गावकरी विचारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here