धानोरा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्याविना रामभरोसे : विकासकामांना ब्रेक

243

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २५ नोव्हेंबर : स्थानिक नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांची बदली आकोट येथे झाल्याने त्या ठिकाणी कोणतेही नवीन मुख्याधिकारी रुजू झाले नाही व किंवा इतर कोणाकडेही पदभार सोपविण्यात आलेला नाही त्यामुळे धानोरा नगरपंचायत रामभरोसे अशीच आहे.
धानोरा तालुक्यात एकमेव असलेली नगरपंचायत ही मुख्याधिकाऱ्यांविना आहे. येथिलमुख्याधिकारी यांची १६ नोव्हेंबर २०२२२ रोजी आकोट येथे बदली होवून गेल्याचे कळते. ते जाण्यापूर्वी येथिल कारभार इतर दुसऱ्याकडे सोपविने आवश्यक होते मात्र तसे न झाल्याने नगरपंचायत आता रामभरोसे असल्याने विकासकामांना ब्रेक लागला आहे. येथिल मुख्याधिकारी येथिल कारभार गडचिरोली वरुण चालवित होते. येथिल कर्मचाऱ्यांना सह्या व इतर कामा करिता गडचिरोलीला जावून घ्यावे लागत होते. मुख्याधिकाऱ्याविना धानोरा नगरपंचायत मधील विकास कामांना ब्रेक लागलेला आहे. प्रशासकीय अधिकारी नसल्याने विकास कामाचा खोळंबा झालेला आहे .येथील अनेक कामे आवासून उभे आहेत. धानोरा नगरपंचायतीच्या विकिसा करिता मुख्याधिकारी गरज आहे. तरी येथिल नगरपंचायतीला मुख्याधिकारी देण्यात यावे अशी मागणी धानोरा येथील नगर नगरवासीयांची आहे.

येथिल मुख्याधिकारी यांची बदली आकोट येथे झाली आहे. पण येथिल कारभार कोणाकडेच दिलेले नाही. या सबंधाने लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेवून  मुख्याधिकारी यांची मागणी करणार आहे.

-ललित बरछा
उपध्याक्ष नगरपचायत धानोरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here