धानोरा : लेखा येथे परमहंस राधेश्याम बाबा महासिद्ध यात्रा संपन्न

219

The गडविश्व
ता. प्रा / धानोरा, ७ फेब्रुवारी : तालुक्यापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या लेखा येथे परमहंस राधेश्याम बाबा समाधी मंदिर लेखा (मेंढा) यांच्या वतीने पुण्यतिथी उत्सव तथा महासिद्ध यात्रा ५ फेब्रुवारी २०२३ ला माघ पौर्णिमेला आयोजित करन्यात आलेल्या यात्रेला नागरिकांनी भरभरुण प्रतिसाद दिला. राधेश्याम बाबा यांचे पदस्पर्शाने पावन झालेली लेखा या भूमीत मानवतेचा संदेश देत यात्रा महोत्सवाचे हे ४६ वर्ष असून ही यात्रा या वर्षी ४ व ५ फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आली होती.
या जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहून दर्शन घेतले. धानोरा तालुक्यातील भाविक भक्तांनी यात्रेस उपस्थित राहून समाधी मंदिराचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन राधेश्याम बाबा सेवा समिती तर्फे करण्यात आले होते त्यानुसार ४ व ५ फेब्रुवारी ला या दोन दिवसीय चालणाऱ्या यात्रेत जवळपास २० हजार भाविकांनी हजेरी लावली होती. ४ फेब्रुवारी शनिवारला या समितीच्या वतीने परिसर स्वच्छता सामूहिक ध्यान पालखी मिरवणूक कीर्तन जागृती भजन इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले तसेच ५ फेब्रुवारी रविवारला ग्रामगीतेचे वाचन व मार्गदर्शन ह. भ.प. डॉक्टर नवलाजी मुळे अड्याळ टेकडी यांनी केले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या यात्रेत धानोरा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी राधेश्याम बाबाचे दर्शन घेतले.
या कार्यक्रमात महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी जे.एस.पी. एम. महाविद्यालय धानोरा च्या राष्ट्रीय सेवायोजन विभागाचे विद्यार्थी व प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश बनसोड व त्यांची टीम जे.एस. पी. एम महाविद्यालयचे प्राध्यापक रविवार सुट्टीचा दिवस असून देखील प्राध्यापकाणी आपली उपस्थिती लावली. यामध्ये प्रा. डॉ. राजू किरमीरे, प्रा. डॉ. गणेश चुधरी, प्रा. डॉ संजय मुरकुटे, प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा. संजय वाळके, प्रा. भाविकदास करमनकर, राकेश बोनगिरवर, बालाजी राजगडे इ तसेच वाघाडे आयटीआय धानोरा चे विद्यार्थी, प्रियदर्शनी हायस्कूलचे विद्यार्थी तसेच गावातील व धानोरा तालुक्यातील नागरिक यांनी सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमाला व महाप्रसादाला गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी आपले हजेरी लावली.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Bard AI) (Aaron Finch) (Hogwarts Legacy) (Victoria Gowri) (Ravi Shastri) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (धानोरा) ( सावरगाव )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here