The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १२ : तालुक्यापासून नऊ किमी अंतरावर असलेल्या जपतलाई गावाजवळ डुकरे घेऊन जाणारे पिकअप वाहन पलटून अपघात झक्याची घटना मंगळवार १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात काही डुकरे ठार झाल्याचे कळते.मिळालेल्या माहितीनुसार आंध्रप्रदेश येथून छोटे पिकप वाहनातून डुकरे घेऊन धानोरावरून मुरूमगाव मार्गे छत्तीसगडला जात असताना वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते वाहन जपतलाई गावाजवळ पलटून अपघात झाला. या अपघात काही डुकरे जागीच ठार तर काही जखमी झाल्याचे कळते. यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.