– आरोग्यावर होत आहेत गंभीर परिणाम
गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०४ : येथील गणेश सहकारी भात गिरणी मधून निघणाऱ्या धुळीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असुन येथील नागरिकांना याचा गंभीर परिणाम सोसावा लागत असल्याने या गंभीर समस्येकडे नगरपंचायत अधिकाऱ्यांनी लक्ष देवून संबंधित समस्या दूर करण्याची मागणी भुषण उंदिरवाडे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील गणेश सहकारी भात गिरणी (राईस मिल) येथून निघालेल्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यानंतरही पदाधिकारी या समस्या दूर करण्यासाठी कोणतेही उपाययोजना करताना दिसत नाहीत. शहरातील गणेश राईस मिल मधून बाहेर पडलेल्या धुळीच्या कणांमुळे नागरिकांच्या डोळ्यावर, शरीरावर परिणाम होवून विविध आजार होत आहेत. अनेकाना श्वसनाचे आजार होत आहे. याचा त्रास शहरातील नागरिक भोगत असून हे शहरातील वार्ड क्रमांक १५, १६ आणि १७ येथील नागरिकांना जास्तच प्रमाणात त्रास सोसावे लागत आहे. येथील नागरिकांच्या घरावर राईस मिलचा कोंडा खूप मोठ्या प्रमाणात उडत असतो घरावर धुळीचे साम्राज्य पसरलेला आहे याचे गंभीर परिणाम नागरिकांना सोसावे लागत असल्यामुळे या संबंधाने पदाधिकाऱ्यांनी लक्ष न देता याच्यावर कोणताही उपाय न केल्याने सर्वसामान्य लोकांना कमालीचा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे नगर प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी उंदीरवाडे यांनी मुख्याअधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.