धानोरा : सालइटोला-वरकेकसावासीय पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत

350

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १८ जानेवारी : तालुक्यातील चुडियाल ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सालईटोला व वरकेकसा हे दोन गाव गट ग्रामपंचायत म्हणून या गावांचा समावेश आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. परंतु या गावांना जाण्यासाठी आजही पक्का रस्ताच नाही, दऱ्या खोऱ्यातुन झाडा झुडपातून वाट काढावी लागते म्हणून या गावाला जोडणारा रस्ता ग्रामपंचायत च्या रोजगार हमी योजनेतून बनवायचा असे ठरले त्यानुसार रस्त्यावर रेवाळी बोल्डर दोन वर्षापासून टाकून ठेवली आहे. पण त्या रस्यावर अजून पर्यंत मुरूम टाकण्यात आला नाही. त्यामुळे या गावांना जाण्यासाठी अजिबात रस्ताच नाही. टाकून ठेवलेल्या रेवाळीवरून दुचाकी चार चाकी साधी सायकल तसेच मनुष्याला सुद्धा फायदा चालता येत नाही असा हा रस्ता आहे. त्यामुळे या दोन गावातील नागरिकांना नाहक त्रास दोन वर्षांपासून सहन करावा लागत आहे .
गावाचा रस्ता रोजगार हमी योजनेतून असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने रोडवर रेवाडी बोल्डर टाकले परंतु त्याच्यावर मुरून टाकणे गरजेचे होते परंतु त्यावर मुरूम टाकले नाही. याबद्दल चुडियाल ग्रामपंचायतीचे सरपंच यांना विचारले असता मुरुमाची रॉयल्टी नाही असे सांगितले त्यामुळे रेवाडी वर मुरूम टाकला नाही. जर मुरमाची रॉयल्टी नव्हती तर रस्त्यावर रवाडी बोल्डर का बर टाकले असा प्रश्न उपस्थित होतो ? तसेच ती कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आली ? याचा दोन वर्षापासून दोन गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे मुरमाची रॉयल्टी नव्हती तर रस्त्यावर रवाडी का टाकली असा सवाल दोन्ही गावातील नागरिक विचारत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन समस्या दूर करण्याची आवश्यकता आहे.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Tejasvi Surya) (Crystal Palace vs Man United) (Wolves vs Liverpool) (SBI PO Prelims Result) (JEE Main 2023 Admit Card)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here