The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २९ : तालुक्यातील निमगाव येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पक्षांचा प्याऊ या उपक्रमांतर्गत पक्षांकरिता पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांनी केली.
पक्षांचा प्याऊ या उपक्रमा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेत कडक उन्हाळ्यामध्ये पक्षांना पिण्यासाठी पाणी व अन्न मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले छोटे प्याऊ झाडावर टांगण्यात आले. सदर उपक्रम शिक्षिका सौ. उषा बोरकर, कुमारी वर्षां नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत राबविण्यात आला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora)