The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ५ ऑगस्ट : तालुक्यातील धानोरा ते रांगी मार्गावर असलेल्या कठाणी नदीवर च्या पुलावरचे लोखंडी संरक्षण कठडे नसल्याने भरघाव वेगाने जाणाऱ्या वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संरक्षण कठड्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकाकडून तीव्र रोष व्यक्त केले जात आहे.
धानोरा ते रांगी मार्गावर आरमोरी तहसील ला जोडणारा पूल आहे. या रस्त्यावरून वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रांगी परिसरातील नागरिकही तालुका मुख्यालयात कामासाठी दररोज येत असतात मात्र या मार्गावरील कठाणी नदीच्या पूलाला असलेले संरक्षण कठडे नसल्याने पूल ओलांडताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच पुला वरील लोखंडी खांब वाकलेले आहे. अशा वेळी वाहन जवळून गेले तर नक्कीच मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जोरदार पाऊस होऊन कठाणी नदीवर पुलावर पाणी असते व रस्ता सुद्धा1 बंद होते. अशावेळी एखाद्याने गाडी काढण्याचा प्रयत्न केल्यास लोखंडी रॉड लागण्याचा व कठडे नसल्याने वाहनाचा अपघात होऊन वाहन पुलाखाली कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे या कठाणी नदीवरील संरक्षण कठडे व लोखंडी राड सरळ करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.