The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ मार्च : रस्त्याने चालण्याचे काही नियम आहेत. आपण रस्त्याने पायदळ चालत असताना डाव्या बाजूने चालावे असा नियम आहे परंतु आपण आपल्या बाजूने चालत असताना आपणाला काहीही होणार नाही व आपला अपघात होणार नाही असे वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे. आपल्या मागून कोणीतरी येईल आणि आपल्याला गाडीने धडक देऊन निघून जाईल असाच प्रकार २५ मार्च २०२३ रोजी दुपारी धानोरा येथील विश्राम गृहाजवळ घडला.
प्राप्त माहीतिनुसार धानोरा येथिल जे. एस. पी. एम .महाविद्यालय वर्ग ११ वी ला शिकणारी विद्यार्थिनी छाया शालिक नरोटे (१६) ही शनिवार ला सकाळी कॉलेज आटोपून परत जात असताना प्रियदर्शनी विद्यालयाच्या गेट जवळ आपल्याच बाजूने जात असताना अज्ञात दुचाकी ने मागून धडक देऊन पसार झाला. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. जखमी अवस्थेत मागून येणाऱ्या व्यक्तींने खाजगी दवाखान्यात नेत प्राथमिक उपचार केले. विद्यार्थिनीने घरी जपतलाईला गेल्यानंतर घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला, लगेच वडिलांनी तिला प्राथमिक रुग्णालय धानोरा येथे सायंकाळी भरती केले. त्यानुसार धानोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून अज्ञात दुचाकी चालकाचा शोध धानोरा पोलीस करित आहेत.
(The gadvishva) (The gdv) (dhanora gadchiroli) (accident)