धानोरा : शिक्का चोरुन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी करुन प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

956

-तालुक्यातील नागरिकांची मागणी
– धानोरा उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकार
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ मार्च : येथील उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी आत्राम यांनी सुट्टिवर असुनही शिक्का चोरुन नरेद्र राऊत यांची स्वाक्षरी मारून अनेक लोकांना गावठाण संबंधित प्रमाणपत्र वितरित केल्याने धानोरा तालुक्यात हळकम माजले असून असा पराक्रम करणारा कर्मचारी मात्र मोकाट कसा ? असा प्रश्न धानोरा तालुक्यातील जनता विचारत असुन संबधित विभागातुन देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तालुक्यातिल जनतेनी केली आहे.

धानोरा येथील मुरुमगाव रोडवर असलेल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आत्राम कर्मचारी कार्यरत असुन ते सर्वेअर पदावर असल्याचे कळते. तर सदर कर्मचारी मागील दोन महिन्यापासून सुट्टीवर असुन काल पर्यत कार्यालयात रुजु न झाल्याचे कळते. इतर कर्मचारी संपावर असताना आत्राम यांनी मुख्यालय साहाय्यक नरेद्र राऊत यांच्या ड्रॉप मधील शिक्क्यांची चोरी करून लोकांना प्रमाणपत्र वितरित केल्याची बाब २३ मार्च २०२३ रोजी उघडकिस आली. ही बाब कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर संपुर्ण तालुक्यात खमंग चर्चा सुरु झाली. प्रमाणपत्रावर चक्क राऊत यांची स्वाक्षरी करून लोकांकडून पैसे वसुल करुण प्रमाणपत्र वाटप केल्याने लोकांकडुन आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नगरपंचायत मधून अनेक लाथार्थाना घरकुल मंजुर झालेले आहे. सन २०२२-२३ या सत्रात मंजुर घरकुलासाठी आवश्यक असणाऱ्या मालकी हक्काचे प्रमाणपत्राची गरज होती. हिच लोकांची गरज लक्षात घेवुन दोन महीन्या पासुन बिनपगारी सुट्टी वर असलेल्या आत्राम यांनी कार्यालयातिल शिक्का चोरुण लोकांच्या गावठाण, नक्कल, नकाशा इत्यादी प्रमाणपत्रावरती शिक्का मारुण संबंधित मुख्यालय सहायक नरेद्र राऊत यांची स्वाक्षरी मारुण प्रमाणपत्र दिले. सदर कर्मचारी कार्यालयात नसल्याचे फायदा उचलत आत्राम यांनी चक्क आर्थिक उलाढाल करीत लोकांना प्रमाणपत्र वितरित केल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दोन महिन्या पासुन सुट्टी वर असलेला कर्मचारी कार्यालयात आलाच कसा? त्याला परवानगी दिलि कुणी? अधिकाऱ्याची सही मारण्याची हिम्मत केली कशी? यापूर्वीही त्यांनी असे प्रकार केले नसेल हे कशावरुण ? किति प्रमाणपत्र दिले याची तपासणी होणे गरजेचे असतानाही २४ मार्च २०२३ ला फक्त समज देवून अधिकाऱ्यानि वाऱ्यावर सोडलेच कसे? असे कृत्य त्यांनी यापुर्वि केले नसेल कशावरुण ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लोकांना मिळालेली नाहीत. त्यामुळे निश्चितच आत्रामला अधिकारी पाठिशि घालत तर नाही ना अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. सदर व्यक्तीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी धानोरा तालुक्यातील जनता करीत आहे. कार्यालयात कधीही न दिसणाऱ्या वड्डेट्टीवार मॅडम आल्या आणि समज देवुन गेल्या हे लोकांना सांगण्यासाठी तर नाहीना.

सदर कर्मचारी हा व्यसन मुक्ती केंद्रात उपचार घेत होता. त्याला वड्डेट्टीवार मॅडम यांनी समज देऊन यापुढे असे कृत्य केल्यास कारवाई करण्यात येईल. एकाच गावठाण प्रमाणपत्रावर सही करून प्रमाणपत्र देण्यात आले होते. असे भूमी अभिलेख कार्यालयाचे मुख्यालय सहाय्यक राऊत यांनी भ्रमणध्वणीवरुण प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

(The gadvishva) (the gdv) (dhanora gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here