The गडविश्व
ता.प्र / धानोरा , दि. १३ : शहरापासून नजीकच असलेल्या लेखा येथील युवाकाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना १२जून रोजी सायंकाळी उघकीस आली. माणिक बाळकृष्ण मोहुर्ले (२६) रा. लेखा असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
माणिक हा शेती व इतर काम करायचा. त्याचे जमतेम सातवीपर्यत शिक्षण झाले होते. दरम्यान १२ जून ला नातेवाईकाकडे तेरवी कार्यक्रमाची लगबग सुरू असतांना माणिकने गावालगतच्या झाडाला दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. सायंकाळच्या सुमारास काही महिलांना त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची माहिती पोलीसांना देण्यात आली असता घटनास्थळ गाठून पचंनामा केला. माणिक ने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अदयाप अस्पष्ट आहे. पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #Mohan Majhi #iOS 18 #PAK vs CAN #Malawi #Andhra Pradesh Chandrababu Naidu #Darshan news #South Africa vs Bangladesh