मोठे भगदाड पडुन धानोरा ते मुरुमगाव राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात

256

– ट्रक फसल्याने दुतर्फा लांबच लांब रांगा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २५ सप्टेंबर : धानोरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने धानोरा ते मुरुमगाव राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली असून सोमवार २५ सप्टेंबर ला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० या रोडवर सालेभट्टी या गावाजवळ मोठ मोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यात सीजी ०८ एव्ही ८८३ क्रमांकाचा छत्तीसगड ला जाणारा ट्रक फसल्यामुळे ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक सकाळपासून एकेरी वाहतूक सुरु असून छोट्या वाहनांना वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आज सकाळी ट्रक फसल्याने मोठ्या आणि अवजड वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मोठे वाहन धारक आपली वाहने काढण्यासाठी हिम्मत करताना दिसत नाही. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे या रस्त्याने छत्तीसगड ला जाणारे व छत्तीसगड वरून गडचिरोली हैद्राबाद ला जाणारे मोठे ट्रक आणि अवजड वाहने ‌दिवस रात्री चालतात. त्यामुळे रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे. जिथे तिथे भगदाड निर्माण झाले आहेत. संबधित विभागाने या महामार्गाकडे लक्ष देऊन रस्त्यावरचे खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करावा अशी अशी मागणी वाहनधारक आणि परिसरातील लोकांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here