धानोरा : ट्रॅक्टर-दुचाकीची जबर धडक, युवक ठार

2134

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २३ : रांगी ते धानोरा मार्गावरील सोडे आश्रम शाळे जवळ ट्रॅक्टर व दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २३ जानेवारी ला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. विक्की किरंगे ( वय २६ ) रा. सोडे असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्की हा काही कामानिमित्त धानोरा येथे गेला होता. दरम्यान धानोरा येथून एमएच ३३ एफ ३०६८ क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे परत जात असताना सोडे आश्रम शाळे समोरील वळणावर सोडे मार्गे येत असलेल्या एमएच ३३ – ४६०५ क्रमांकाच्या स्वराज कंपनीची ट्रॅक्टर व दुचाकीची जबर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात विक्की किरंगे ला जबर मार लागल्याने तात्काळ धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
मृतक विक्की हाकुटूंबातील एकुलता एक असल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here