धानोरा : सोडे आश्रम शाळेजवळ झालेल्या दुचाकी अपघातात दोघेजण जखमी

590

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १२ एप्रिल : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्यातील सोडे येथे घडली. प्रफुल्ल तोफा (२४) रा.तुकुम, देवदास पदा (३०) राहणार नवरगाव अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
धानोरा तालुक्यातील प्रफुल तोफा हा आपल्या वैयक्तिक कामासाठी जांभळी गावाकडे दुचाकीने जात होता तर दरम्यान दुसरी दुचाकी नवरगाव मार्ग धानोरा शहराकडे येत होती. धानोरा पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर सोडे आश्रम शाळेच्या जवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात प्रफुल तोफा व देवदास पदा आहे दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले. अपघाताच्या वेळी देवदास पदा यांच्या दुचाकी वर एक महिला बसलेली होती मात्र सुदैवाने सदर महिलेला दुखापत झाली नाही। घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलिसांनी घटनास्थळ काटून पंचनामा केला पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here