– नागरिकांनी आपल्या आसपास असणाऱ्या दिव्यांगांना माहिती देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, १५ फेब्रुवारी : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्येशाने शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असते. वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळाले नसल्याने दरवर्षी शेकडो दिव्यांगांना शासकीय तथा इतर योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई होते. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्येशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्रणालीद्वारे निर्गमित दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. हाच दृष्टिकोण लक्षात घेऊन निर्धारित वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता २० फरवरी २०२३ ते १६ मार्च २०२३ या कालावधीमध्ये दिव्यांगत्व प्रमाणपत्र विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिली.
जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली यांच्या संकल्पनेतुन गडचिरोली जिल्हयातिल दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील तज्ञांमार्फत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राकरीता निश्चिती करून केंद्र शासनाच्या स्वावलंबन प्रणालीद्वारे त्यांना दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी तपासणी व निदान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद, गडचिरोली व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आणि मिशन इंस्टिस्टयुट फार र्टेंनिग रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, याकरिता जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली, कुमार आर्शिवाद , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. राजेंद्र भुयार व जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. अनिल रुडे, मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत व सचिव संजय पुसाम यांचे मार्फत गडचिरोली जिल्हयातिल सर्व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी जिल्हयातिल सर्व गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, वैदयकिय अधिक्षक, तालुका आरोग्ग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण आरोग्य विभागातील सर्व वैद्यकिय तज्ञ, डॉक्टर्स, समन्वयक समग्र शिक्षा अभियान आणि व्यावसायिक तज्ञ डॉक्टर्स यांचेद्वारे शहरी व ग्रामिण भागातील सामजिक संस्था, त्यांचे पालक, शिक्षक, अंगनवाडी सेविका, आशा वर्कर यांना तसेच दिव्यांग कल्याणार्थ कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांना प्रशिक्षण देऊन व यांच्या सहकार्याने नागरिक सुविधा केंद्रातील‘कॉमन सर्विस सेंटर’(Common Service Centre-CSC) https://www.swavlambancard.gov.in या पोर्टलवर ८६६४ दिव्यांग बांधवांच्या अर्जाची प्राथमिक नोंदणी सुध्दा करून घेण्यात आली आहे. जिल्हयातिल १२ तालुक्यातील ७२२ बौधिक अक्षम असलेल्या मुलांचा बुध्दी गुणांक (IQ Testing) प्राथमिक तपासणी शिबिर जिल्हयातिल ३० विविध ठिकाणी दि.30/01/2023 ते 10/02/2023 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींकरिता ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी गडचिरोली जिल्हयातिल तालुकानिहाय ग्रामीण रुग्णालय तथा उप जिल्हा रुग्णालय अशा एकुण १८ ठिकाणी दिव्यांग बोर्डाच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत ८६६४ दिव्यांगत्व तपासणी व निदान करून पात्र दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रचार प्रसिद्धी सुद्धा करण्यात येणार आहेत.
याकरिता प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, ज्या दिव्यांग व्यक्तींकड़े जुने दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहेत किंवा दिव्यांग प्रमाणपत्र नाही, त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता निश्चित वेळापत्रकानुसार घेण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये उपस्थित रहावे.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)