– भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १ : मागील अनेक दिवसापासून कुरखेडा नगरपंचायत येथे कंत्राटावरून वाद निर्मितीची स्थिती असून मोठ्या प्रमाणात कंत्राट मॅनेज करून अधिकारी व पदाधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप होत आहे.
अनेक दिवसापासून कुरखेडा नगरपंचायत येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने येथील कामांना व नागरिकांना न्याय मिळत नसल्याची खदखद होती. परंतु आता पूर्णवेळ मुख्याधिकारी प्राप्त झाल्यानंतरही नागरिकांची ही खदखद अजून दूर झालेली नाही. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या निधीची एका प्रकारे बंदर वाट सुरू असून मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट झाल्यास किंवा रिंगमध्ये कंत्राट दिल्यास त्या कंत्राटदाराला विना विलंब कार्यारंभ आदेश दिला जातो परंतु रिंगच्या बाहेरील व मर्जीतील नसलेल्या कंत्राटदाराने निविदेमध्ये सहभाग घेऊन कमी दराची निविदा सादर केली तर त्याला अनावश्यक कागदपत्राची पूर्तता करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जातो व एकंदरीत त्या कंत्राटदाराला या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी मजबूर केले जाते. परंतु जर एखाद्या कंत्राटदार यांच्या सगळ्या मजुरीला तोंड देत असेल व प्रत्येक गोष्ट नियम व कायद्याने अंमलबजावणी करून पूर्ण करण्याची घाट घालत असेल तर त्याला सात ते आठ महिने विलंब होऊ नये कंत्राट बहाल केला जात नाही किंवा त्याला कार्यारंभ आदेश दिला जात नाही अशी परिस्थिती सध्या कुरखेडा नगरपंचायत येथे आहे.
विलंब होत असलेल्या या सगळ्या प्रक्रिया संदर्भात माहिती विचारण्यासाठी मुख्याधिकारी कक्षात कोणी गेल्यास मुख्याधिकाऱ्यांकडून त्यांना आपणास पत वागणूक दिली जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये वरिष्ठांच्या आशीर्वाद असल्याने ते सगळं होत आहे अशी चर्चा सध्या कुठे आहे. कुरखेडा येथे नाट्यमय राजकीय बदल होऊन सत्ता पक्ष व विपक्ष हात मिळवणे करून एकत्र पंचायत मध्ये पदाधिकारी झाले. भारतीय जनता पक्षाकडून सत्तेची सूत्रे हिसकावल्यानंतर शिवसेना व काँग्रेस यांनी भारतीय जनता पक्षाच्या बंडखोर उमेदवाराच्या भरोशावर सत्ता स्थापन केली होती. बंडखोर उमेदवाराला अपात्रते संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागून प्रकरण परत जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आले. आता बंडखोर उमेदवाराची अपात्रता निश्चित असताना आपसी समझोता करून ” तेरी भी चूप, मेरी भी चूप”, मै भी खाता, तुम्ही खाव”, या प्रकारची धोरण अवलंब करत या ठिकाणी होणाऱ्या सर्व नियमबहाय कामांना एकमताने संमती दर्शवून नगरसेवकांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने सहभागाने शासन कडून येणाऱ्या निधीचा विनयोग केला जात आहे.
शासनाचा प्रतिनिधी म्हणून मुख्याधिकाऱ्याकडे ही जबाबदारी असते की, या ठिकाणी होणाऱ्या अनैतिक कामाला आळा घालून शासनाची बाजू व नागरिकांमध्ये समन्वय ठेवावा. परंतु येथील मुख्याधिकारी फक्त येथील पदाधिकारी व नगरसेवकांच्या मर्जीप्रमाणे वागत असून ते सांगतील ती काम व ते म्हणतील तसं वागणं करत आहेत. कुरखेडा नगरपंचायत येथे प्राप्त होणाऱ्या निधी खर्चाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात अनियमित असून या संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून बेलगाम झालेल्या सत्ता व प्रशासनाला लगाम घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.