The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.१९ : श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये वर्ग ८ ते १२ च्या सावित्रींच्या लेकींना मानव विकास मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या सायकल चे वाटप विद्यालयाचे प्राचार्य व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , केंद्रप्रमुख यांच्या हस्ते २४ विद्यार्थिनींना करण्यात आले . या वेळी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर सुखद आनंदाची पर्वणी पाहायला मिळाली असून शाळेमध्ये ये – जा करण्याकरीता विद्यार्थींनी सायकल चा उपयोग करणार आहेत .
सायकल वितरण प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार, केंद्रप्रमुख एस. शिवहरे, लेनगुरे ( बी.आर.सी. ), शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष छायाताई खंडाईत, विद्यालातील पर्यवेक्षक किशोर कोल्हे, शिक्षक लीकेश कोडापे, महेंद्र नवघडे, रुपेश भोयर, स्वप्नील खेवले, शिक्षकेत्तर कर्मचारी अनिल बांबोले, लोकेश राऊत, शिवा भोयर, घनश्याम भोयर व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते .