दखणे विद्यालयात विद्यार्थिनींना सायकलचे वितरण

310

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १२ मे : तालुक्यातील मुरुमगाव येथील स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत बाहेरगावावरून पाच किमी अंतरापर्यंत ये- जा करीत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कमलाबाई दखणे, बी.जे.मेश्राम , जी.जे चिंचोलकर, विलास चौधरी, रमेश निसार, सुरेश तुलावी, चक्राविर शहा महाराज आणि पालक वर्ग उपस्थित होते. शालेय विद्यार्थींनीना सदर योजनेअंतर्गत सायकलचे वितरण झाल्याने त्यांना शाळेत येणे सुकर झाले आहे. या कार्यक्रमाचे संचालन शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव बी.जे बोरकर यांनी केले.

(the gdv, the gadvishva, dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here