The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १६ : बायफ संस्था आणि मानूधने फाऊंडेशन फॉर एक्सलन्स च्या वित्तीय सहकार्याने धानोरा तालुक्यातील २२ गावातील ४०० शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी धान्य बियाणे वाटप १५ जून रोजी करण्यात आले.
धानोरा तालुक्यातील विविध गावातील गरिबी व गरजू शेतकऱ्यांना यावेळी विविध जातींच्या वान वाटप करण्यात आले. यात कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली च्या मार्गदर्शनाखाली, आदिवासी उत्थान प्रकल्प धानोरा द्वारे PDKV किसान, PDKV साधना व PDKV तिलक या जातीचे बियाणे देण्यात आले.
यावेळी बायफ संस्थेचे प्रकल्प अधिकारी श्री. शिशुपाल लोणारे, राहुल मदनकर, विवेक देवरे, गीतांजली वाने, संतोष ठलाल, प्रदीप बनसोड, प्रज्वल,गीतांजली वाने , पुनम कावळे, मीना शेंडे, संदीप भांडेकर, प्रभुदास गेडाम, उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora )