The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०४ : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या वतीने पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या संकल्पनेतून उपविभागीय पोलिस अधिकारी भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र चातगाव तर्फे आदिवासी मुला मुलींना थंडीच्या संरक्षण करण्यासाठी ५० जरकिन (कोट) चे वाटप माध्यमिक आश्रम शाळा गिरोला येथे प्रभारी पोमके पाटील, बूधाजी पाटील सेवानिवृत्त पोलिस, प्रकाश चौधरी पोमके चातगाव, जयेंद्र गायकवाड, कटरे, मुख्याध्यापक वाय. पी. म्हाशाखेत्री, घुटके, गेडाम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, मनीषा सातपुते अधिक्षिका मॅडम माध्यमिक आश्रम शाळा गीरोला, मंगर, संगीता दरो त्याचप्रमाणे पोलीस मदत केंद्राचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक खोब्रागडे यांनी केले तर आभार चेंबुलावर यांनी मानले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.