– कायद्याचा आधार घेऊन कृती करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, २५ मार्च : अवैध दारू व तंबाखू विरोधात कृती करण्यासाठी कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे अतिदुर्गम म्हणून ओळख असलेल्या एटापल्ली तालुक्यातील ५५ गावातील गाव संघटनेच्या सदस्यांना ‘कायदा पुस्तिका’ भेट देण्यात आली. सोबतच बैठकीच्या माध्यमातून कायद्याचा आधार घेऊन दारू व तंबाखूमुक्त गाव निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
अवैध दारू व तंबाखू विरोधात लढा देण्यासाठी सुरु असलेल्या मुक्तीपथ अभियानात प्रमुख सहभाग हा जनतेचा आहे. त्यामुळे गाव संघटनेच्या सदस्यांना दारू व तंबाखूवर रोख लावण्यासाठी कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी गाव संघटनेच्या सदस्यांना कायदा पुस्तिकेचे वाटप केले जात आहे. गाव संघटनेच्या सदस्यांना दारूबंदीच्या प्रमुख कलम व कायदे, पेसा कायदा १९९६, ग्रामपंचायत अधिनियम नुसार गावात दारूविक्रीबंदी अधिनियम, सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखा बंदी कायदा- २०१२, अल्पवयीन मुलांसाठी संरक्षण कायदा – २०१५, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ कोटपा (COTPA), महाराष्ट्र राज्य अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ कलम ६ नुसार, साथरोग प्रतिबंध कायदा आदी कायद्यांची विस्तृत अशी माहिती या पुस्तिकेत आहे.
एटापल्ली तालुक्यात एकरा, हेडरी, बांडे, गुरूपल्ली, करेम, डूमे, जवेली, गेदा, चंदनवेली, दोड्डी, तांबडा, तोडासा, परसलगोंदी उडेरा, बुरगी, कांदोली, पेठा, अलेंगा, लांझी, एकनसुर, कोटमी, यटावाही, आसावांडी, जारावांडी, दींडवी, भापडा, चनाबोडी, मोरावाही, वेलमागड, सोहगाव, जाजावांदी, येमली, पैमा, वडसा कला, वळसाखुर्द, कसूरवाही, पेंदुलवाही, रोपी, रेचा, झारेवाडा, देवदा, मवेली, हालेवारा, वट्टेगटा, बटेर अशा एकूण 55 गावात कायदा पुस्तिका देण्यात आल्या. गावांमध्ये बैठकीचे आयोजन करून गावातून दारू व तंबाखू हद्दपार करण्यासाठी कोणत्या कायद्याचा कसा वापर करायचा याबद्दलची माहिती तालुका संघटक किशोर मलेवार व मुक्तिपथ तालुका चमूने दिली.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nowruz) (Harry Styles) (Patna railway station) (Hindu Nav Varsh 2023) (Tamilnadu Budget 2023) (Caste verification certificate will now be made mandatory for admission to non-professional courses)