The गडविश्व
गडचिरोली, १ डिसेंबर : तालुक्यातील जेप्रा, दिभना, राजगाटा माल, राजगाटाचेक येथे एलपीजी गॅस चे वाटप करण्यात आले.
गावातील सरपण अभावी वनविभाग अंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी, के.बि. उसेंडी, चुरचुरा, दिभनाच्या वनरक्षक कु. उसेंडी, चुरचुराचे वनरक्षक डी .वि.पोफडी यांच्या हास्ते गावातील लोकांना गॅस वितरित करण्यात आले.
गॅस वितरित करतांना गावातील सरपंचा सौ. शशिकला झंजाळ, उपसरपंचा सौ. कुंदा लोनबले, ग्रा.सदस्य दिलीप गावतुरे, ग्रामसेवक ठाकरे बाबूजी, देवानंद चलाख, ग्रा.पं.सदस्या सौ. सोनाली गोवर्धन आदी उपस्थित होते. एकूण ५७ लाभार्थ्यांना एलपीजी गॅस वितरित करण्यात आले. गॅस वितरित करताना गॅस शेगडी व २ गॅस सिलेंडर देण्यात आले तर चार वर्षे १ सिलेंडर या प्रमाणे १ सिलेंडर मोफत दिल्या जाणार आहे असे सांगण्यात आले.