The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० फेब्रुवारी : तालुक्यातील येरकड येथे ११३ बटालियन सि.आर.पि.एफ.च्या वतीने गावातील नागरीकांना मोफत मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. धानोरा तालुक्यातील ११३ बटालियन केंद्रीय रिझर्व पोलीस बल चे प्रमुख जसवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील नक्षल प्रभावित क्षेत्रातील येरकड येथे सिविक ॲक्शन प्रोग्राम २०२२-२३ अंतर्गत येरकड येथे ११३ च्या वतीने अत्यावश्यक गरज असलेल्या गावातील गोरगरिब नागरीकांना डास, मलेरिया पासून वाचविण्याच्या हेतूने मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. यावेळी बटालियन चे सीआरपीएफ अधिकारी गुलाब सिंह उपकमांडेड, निरीक्षक बाबुलाल जाट, निरीक्षक बामेश्वर कुमार, पोलीस मदत केंद्र येरकडचे पीएसआय गंधकवाद, पीएसआय हरिचंद्र पाटील, एस आर पी एफ चे उपनिरीक्षक पि.आर. भगवत, तसेच शिवकुमार भैसारे, आणि ग्रामवासीय गावातील महिला, पुरुष, तरुण मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv)