स्व. आयुष चोखारे स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण

270

The गडविश्व
चामोर्शी, दि. २५ : तालुक्यातील लक्ष्मणपूर येथील पोलीस पाटील सुरेश चोखारे यांचा मुलगा आयुष चोखारे याच्या स्मृतीप्रित्यर्थ चोखारे परिवाराच्या वतीने लक्ष्मणपूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुधोली चक नं. २ ग्रामपंचायतचे उपसरपंच किशोर खामनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जासुद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप भोयर, पोलीस पाटील सुरेश चोखारे, प्रतिष्ठीत नागरीक बालुभाऊ निखाडे, होमदेव कुरवटकर, मुख्याध्यापक झाडे, आष्टी पोलीस स्टेशनचे मिसार, गोपाळा ठाकूर, गुरूदास पोहनकर, पियुष गोरे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक शिक्षक वनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अग्गुवार, मडावी, कमलेश गौरकार यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here