The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १५ : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय रांगी अंतर्गत कार्यरत अंगणवाडी केंद्रातील ०३ ते ०६ वर्ष वयोगटातील मुला- मुलीना १५ वा वित्त आयोग, अबंधित निधी, महिला व बालकल्याण १० % योजने अंतर्गत ६० विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप रांगी येथील प्रथम नागरिक सरपंचा सौ. फालेश्वरी प्रदीप गेडाम यांचे हस्ते आज १४ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून वाटप करण्यात आले.
अमृत महोत्सवा निमित्ताने हर घर तिरंगा उपक्रम शासन स्तरावरून साजरा करण्यात येत आहे. लहान मुलां- मुलींना वेगळा आनंद असतो. तो द्विगुणित करण्यासाठी रांगी ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात देण्यात आले.
यावेळी उपसरपंच नुरज सुरेश हलामी, सदस्य शशिकांत विठ्ठलराव साळवे, दिनेश ईसनजी चापले, राकेश दयाराम कोरम, सौ. शशिकला उमाजी मडावी, सौ. अर्चना लक्ष्मीकांत मेश्राम, सौ. विद्या हेमंत कपाट, सौ. वच्छला साईनाथ हलामी, महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष तुळशीराम लक्ष्मण भुरसे, मा. सैनिक किसन रावजी आळे, ग्राम पंचायत सचिव मकरंद बापुजी बांबोळे संगणक परिचालक, मोबिलायजर, ग्राम पंचायत कर्मचारी तथा गावातील मान्यवर मोठ्या प्रमानात उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )