The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, २१ जुलै : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आरमोरीच्या वतीने शेतात रोवणी करणाऱ्या महिलांना प्लास्टिक कापड, रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप तसेच तालुक्यातील व परिसरातील विविध समस्यावर निरांकरन करण्याचे कार्य करण्यात आले.
यावेळी शेतात रोवणी करणाऱ्या महिला, रुग्णालयातील रुग्ण व परिसरातील नागरिकांनी आमदार कृष्णा गजबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आरमोरी न. प चे नगराध्यक्ष पवन नारनवरे, सभापती भारत बावणथडे, सभापती विलास पारधी, महिला व बालकल्याण सभापती सुनीता चांदेवार, नगरसेवक मिथुन मडवी, नगरसेविका सुचिता मने, भाजप जिल्हा सचिव अमोल खेडकर , भाजपा तालुका अध्यक्ष नंदू पेटेवार, भा.ज.यू.मो तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, भा.ज.यू.मो सचिव टिंकु बोडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष जितेंद्र ठाकरे, गणेश बहिरवार ठामेश्वर मैंद, अमिताभ राठोड, अक्षय हेमके, विवेक रोडगे, संजय सोनटक्के, राहुल तितीरमारे, योगेश वाघाडे, विनोद आकरे, सुधीर कुंगाटकर, तसेच भाजपाचे कार्यकर्ते व तालुक्यातील सर्वच पदाधिकारी व इतर महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते.