– हरकती असल्यास ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठीची जाहिरात ०४ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ५, ७, ८, १२ आणि १४ फेब्रुवारी २०२४ रोजी लघुलेखक (ग्रेड-3) वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी स्क्रिनिंग चाचणी घेण्यात आली. सदरच्या स्क्रिनिंग चाचणीच्या उत्तर-तालिका आणि हरकत फॉर्म उमेदवारांच्या लॉगिनमध्ये शनिवार २ मार्च ते ४ मार्च २०२४ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर उत्तर-तालिकेतील प्रश्नांसंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी ०२ मार्च २०२४ सकाळी ८.०० ते ०४ मार्च २०२४ रात्री ११.५५ या कालावधीत त्यांच्या लॉगिन मधून प्रश्नांसंबधित हरकती, त्यांच्या हरकतींचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेख्यासह / ऑनलाइन वेबलिंक्स इ. सोबत, ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात. वरील विहित ऑनलाइन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती, कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवाराच्या लॉगिनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल याची उमेदवारांनी याची नोंद घावी असे प्र. प्रबंधक (निरीक्षण-१) उच्च न्यायालय, मुंबई यांनी कळविले आहे.
Login Link : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html
(#gadchirolinews #gadchirolinews #thegdv #hscexam #sscexam #higcort #districtcort #cort_recrutment )