– बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन
The गडविश्व
अहेरी, २५ फेब्रुवारी : तालुक्यातील ग्रा.प.किस्टापुर दौड अंतर्गत दोडगिर (दौड) येथे बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उदघाटन जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे. तर द्वितीया पारितोषिक जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी संग गंगाधर मडावी व ग्रामसेवक सुधीर मडावी यांच्या कडून तर तृतीय पारितोषिक योगेश मडावी तथा रामा मडावी यांच्या कडून देण्यात येत आहे. सदर उदघाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारेजी रापंजी हे होते. यावेळी अहेरी पं.स. माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, सरपंच शांता सिडाम, दोडगेर जि. प शाळेचे शिक्षक सिडाम, सुनीता मडावी, शामराव गावळे, आनंद जियाला, वल्लीताई वेलादी, चिंना तलांडे, माजी सरपंच बड्डे वेलादी, किशोर मडावी, चंदू मुलकारी, सानू मडावी, आविसंचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (Vinay Gowda) (National Commission for Scheduled Tribes) (Maharashtra DGP Rajnish Seth) (Municipal Corporation of Delhi) (Women’s World Cup) (Sergio Ramos) (The Gdv) (