– ३ मार्च ला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : भारतात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, याकरीता यावर्षीसुध्दा शासनातर्फे जिल्ह्यात ३ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात येत असून सर्वच पालकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी पत्रकार परिषदेत केले.
० ते ५ वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस अवश्य द्या : डॉ. साळवे
– ३ मार्च ला पल्स पोलिओ मोहीम*
#thegdv #thegadvishva #the_gadvishva #gadchirolinews #gadchiroli @InfoGadchiroli @ZPgadchiroli pic.twitter.com/DA9I8WCTgW— THE GADVISHVA (@gadvishva) February 29, 2024
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय टास्क फोर्स ची सभा तसेच तालुकास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण टास्क फोर्स ची सभा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली १५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम ३ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत राबविण्यात येत आहे. सदर मोहीम ग्रामीण क्षेत्रात ३ व शहरी क्षेत्रात ५ दिवसकरिता राबविण्यात येणार आहे. पल्स पोलिओ मोहीम २०२४ मध्ये आरोग्य विभागाचे ४२७ अधिकारी ५ हजार ७४९ कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्याची २०२४ ची मध्यवर्ती लोकसंख्या ग्रामीण १११००९४ तर शहरी १०५५७२ असे एकूण १२१५६६६ तर ० ते ५ वर्ष वयोगटातील अपेक्षित लाभार्थी ग्रामीण ७६९९५ तर शहरी ७१८६ असे एकूण ८४१८१, जिल्ह्याला १०९४३१ एवढे पोलिओ डोस उपलब्ध झाले असून त्यामध्ये ग्रामीण १०००९४ तर शहरी ९३३८, जिल्ह्यात एकूण पोलिओ लसीकरण बूथ संख्या २१९४ असून त्यात ग्रामीण २१४५ तर शहरी २०, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठीकाणी प्रवासात असलेल्या किंवा स्थलांतरीत होत बालकांकरिता ग्रामीण भागात १११ व शहरी भागात २० अशा एकूण १३१ ट्रान्झिट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. अस्थायी निवास असलेल्या, विटभट्टी, लहान पाडे आदि ठिकाणीसुध्दा लसीकरणासाठी पल्स पोलिओ मोबाईल टीम तयार करण्यात आली असून ग्रामीण भागात १७२ तर शहरी भागात १२ असे एकूण १८४ टीम संख्या संख्या आहे.
ही मोहिम अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक यांच्या मदतीने पार पाडण्यात येणार असून आरोग्य विभाग तसेच या कालावधीत वीज खंडित होऊ नये याकरिता महावितरण तसेच परिवहन महामंडळ, रेल्वे स्टेशन, नगरपालिका, पोलीस विभाग, NCC यांची सुद्धा मदत घेण्यात येणार आहे.
( #thegdv #thegadvishva #gadchirolinews #palspolio #पल्स_पोलिओ_मोहीम #Dr_Dawal_salve )