गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान विजयी, नोटा चौथ्या स्थानी

304

The गडविश्व
गडचिरोली,दि.०४ : गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ६ लाख १७ हजार ७९२ मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहिर केला.
डॉ. किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह उपस्थित होत्या. आज ४ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून शासकीय कृषी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया झाली. रात्रो ९ वाजताच्या सुमारास संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली. यात अन्य उमेदवारांना प्राप्त झालेल्या मतांमध्ये – अशोक नेते, भारतीय जनता पार्टी (476096), योगेश गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (19055), धीरज शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (2174), बारीकराव मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (2555), सुहास कुमरे,भीमसेना (2872), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (15922), करण सयाम, अपक्ष (2789), विलास कोडापे, अपक्ष(4402), विनोद मडावी, अपक्ष (6126) प्राप्त झाली तर नोटा ला (16714). एकूण वैध मते 11 लाख 66 हजार 497 आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #drkirsan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here