The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ७ डिसेंबर : स्थानिक जिल्हा परिषद तथा कनिष्ठ महाविद्यालत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डाकराम कोहाडे यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन केले. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी व विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित भाषण तसेच गाणी गाऊन आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे संचालन कु.वैष्णवी पोवरे व शुभम वड्डे यांनी केले. शंकर वाढई याने उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत साळवे, कु.रश्मी डोके, शंकर रत्नागिरी, कु.रेखा कोरेवार,.विजय बुरमवार, प्रमोद सहारे, कु.रजनी मडावी, कु .स्नेहा हेमके, अशोक कोल्हटकर, कु . संगीता निनावे, हरिश पठाण, कु.किरण दरडे इत्यादी शिक्षक, शिक्षिका तसेच बादल वरगंटीवार, जैराम कोरेटी, भालचंद्र कोटगले इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ग ८ च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोलाची मदत केली.
(The Gadvisha) (Gadchiroli News Updates) (Dhanora) (Dr. Babasaheb Aambedkar)