डॉ.शिलू चिमूरकर यांनी दिला कढोली वासीयांना आरोग्याचा मूलमंत्र

138

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ११ : उपजिल्हा रूग्णालय आरमोरीच्या माजी वैद्यकीय अधिकारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शिलू चिमूरकर यांनी आज गुरुवार ११ जुलै रोजी कढोली येथील गुरुदेव सेवा मंडळाला भेट देत उपस्थीत गावकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या आरोग्याची विचारपूस करीत सूदृढ आरोग्याचा मंत्र दिला.
पावसाळ्यात दूषीत पाण्यामूळे उदभवणारे आजार, मच्छरामुळे होणारे कीटकजन्य आजार, सरपटणाऱ्या प्राण्याचा दंशातून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्याबाबत घ्यायवयाची काळजी व उपाययोजने बाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिला संसाराच्या व्यस्त दिनचर्येत आरोग्याकडे दूर्लक्ष करतात त्यामूळे भविष्यात त्यांना गंभीर समस्येचा सामना करावा लागतो त्यामूळे महिला भगिनींनी आरोग्याच्या समस्येकडे दूर्लक्ष न करता वेळीच शासकीय किंवा खाजगी रूग्णालयात तज्ञ वैद्यकीय अधिकारीकडून तपासणी व औषधोपचार करून घ्यावा असे आवाहन सूद्धा यावेळी त्यानी केले.
याप्रसंगी गूरूदेव सेवा मंडळाचे जराते महाराज तसेच गूरूदेव सेवा मंडळाचे सभासद व गावकरी मोठ्या संख्येत हजर होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolilocalnews #kurkheda #kadholi )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here