–प्रात्यक्षिकातुन दिले प्रशिक्षण
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे), २२ जानेवारी : येथे पहील्यांदाच आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षित शेतकरी बनविण्याच्या उद्देशाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अल्पशी अंगमेहनत व वेळेची बचत करुन भरपुर उत्पन्न कसे वाढेल या उद्देशाने श्री वसंतराव मुकुंदराव शेबे प्रगतशील शेतकरी रा. आरमोरी यांच्या शेतामध्ये पिकावर फवारणी करण्यासाठी ड्रोन चे प्रत्यक्षीक व प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले.
त्यावेळी उपस्थित आरमोरी तालुका कृषी अधिकारी आर. कु.जे.व्ही. घरत मॅडम, बी.टी.एम आरमोरी आत्मा व्ही डी. राहंगडाले, आरमोरी कृषी कार्यालयाचे नितीन कुंभारे, क्षीरसागर मॅडम तसेच मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
(Thr Gadvishva) (Armori) (Gadchiroli News Updates) (Drone spraying of crops for the first time at Armori)