The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ३० : स्थानिक श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालीत शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्य २२ ते २८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षण सप्ताह उपक्रमांचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. शिक्षण सप्ताहात आठवड्याचे प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आले. यामध्ये शिक्षण विकासाच्या विविध पैलूचा समावेश उपक्रमात करण्यात आला. शिक्षण सप्ताह उपक्रमांमध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मुलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डीजीटल उपक्रम दिवस, मिशन लाईफ व्दारे इको क्लब उपक्रम आणि समुदाय सहभाग दिवस अश्या विविध उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
शिक्षण सप्ताहामध्ये विविध उपक्रमाव्दारे बहुसंख्य विद्यार्थी सहभाग घेऊन आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले. सामाजिक दायीत्वाची भावना रुजवावी व पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
शिक्षण सप्ताहाचा समारोप विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोज व मिष्ठांन्न देऊन समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )